![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
राजकीय भूमिकेला यश येईल. तुमचा उत्साह वाढीस लागेल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. अति घाई चांगली नाही.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
सामाजिक भान राखावे लागेल. तरुण वर्गाला आशादायक संधी मिळतील. मित्रांच्या सहवासात रमून जाल. भावंडांचे अधिक प्रेम मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
मुलांसाठी लाभदायक गोष्टी घडतील. प्रत्येक गोष्टीत गोडी वाटेल. आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. मित्रांशी वाद घालू नयेत. जमिनीच्या कामातून लाभ होऊ शकतो.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
मानसिक चंचलता जाणवेल. बोलताना भान राखावे. अघळ-पघळ गोष्टी बोलू नका. अनाठायी खर्च करू नका. कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागतील.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
मनोवांच्छित लाभेल. नवीन काम सुखावणारे असेल. मानसिक चांचल्य राहील. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. मित्रांची उत्तम साथ लाभेल.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
तरुण वर्गाचे विचार जाणून घ्याल. काही नवीन ओळखी होतील. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. तुमचा दर्जा सुधारला जाईल. झोपेची तक्रार जाणवू शकते.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
नवीन कामात गढून जाल. अधिकारी लोकांशी भेटता येईल. गोड बोलण्यातून लोक संग्रह वाढेल. कमिशन मधून लाभ मिळवाल. पत्नीचा वरचष्मा राहील.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
उगाच टोकाची भूमिका घेऊ नका. वाढीव मेहनत करावी लागू शकते. वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो. भावंडांशी वाद घालू नका. गुंतवणुकीच्या योजना सावधपणे कराव्यात.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
अचानक धनलाभ संभवतो. काही कामे कमी कष्टात पार पडतील. कथित गोष्टीवर विश्वास ठेऊ नका. आध्यात्मिक आवड वाढेल. पित्त विकार वाढू शकतात.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
प्रशंसेचा दिवस. भावनिक वळणे येऊ शकतात. दांपत्य जीवन सुखकारक राहील. कामात सुलभता येईल. शेजार्यांचा त्रास होण्याची शक्यता.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
मौजमजा कराल. स्वत:ला नियमात बांधू नका. जोडीदाराची प्रगती होईल. नवीन कामात उत्साह जाणवेल. कार्यक्षेत्रात मान, सन्मानाचे योग येतील.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope )
सुसंवादातून लाभ होतील. घरातील कामात मन गुंतवाल. विरोधक शांत राहतील. महत्वाकांक्षी योजना आमलात आणाव्यात. परिश्रमाची कास सोडू नये.