शिवप्रेमी, थेरगावचे सुपुत्र संभाजी बारणे यांचा पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे सन्मान

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – विशेष प्रतिनिधी- पिंपरी-चिंचवड : शिवप्रेमी, थेरगावचे सुपुत्र, साहित्यिक आणि राजकीय नेते संभाजी बाळासाहेब बारणे यांनी साहित्य, इतिहास आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शिवचरित्रावरील तब्बल ६०० पुस्तकांचे संकलन करून त्यांनी सलग दुसऱ्यांदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

संभाजी बारणे यांनी यापूर्वी २०१९ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींच्या विजिटिंग कार्डचे अनोखे संकलन करून विक्रम प्रस्थापित केला होता. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या संकलनाची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली होती.

त्यानंतर २०२६ मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित शिवचरित्राची तब्बल ६०० पुस्तके संकलित करून पुन्हा एकदा अनोखा विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमाचीही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने दखल घेतली असून, सलग दुसऱ्यांदा संभाजी बारणे यांच्या नावाची विक्रम नोंद झाली आहे.

दरम्यान, संभाजी बारणे यांची नुकतीच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचीही यावेळी उपस्थितांनी विशेष दखल घेतली.

संभाजी बारणे हे उत्तम कवी आणि लेखक असून त्यांनी आतापर्यंत अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या कविता संग्रहांना वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहरावर शंभर कवींनी लिहिलेल्या कवितांचे संकलन करून त्यांनी काव्यसंग्रह प्रकाशित केला होता. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.

सामान्यातून असामान्य कामगिरी करत साहित्य, इतिहास आणि संकलन क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या संभाजी बारणे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

पत्रकार संघाचे संस्थापक बापूसाहेब गोरे यांच्या हस्ते संभाजी बारणे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील कांबळे, उपाध्यक्ष रेहान सय्यद, शबनम सय्यद, प्रसिद्धी प्रमुख युनूस खतीब, तसेच सुरज साळवे, गणेश शिंदे, संतोष जराड, विश्वास शिंदे, जितेंद्र गवळी, मुकेश जाधव आणि प्रसाद बोरसे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *