![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. हातातील कलेला वेळ द्याल. जवळच्या ठिकाणी फिरायला जाल.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
उधारीचे व्यवहार नकोत. मुलांच्या सहवासातून आनंद मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. अधिकार्यांच्या रोषाला बळी पडू नका. नवीन योजनांवर काम कराल.
मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
करमणुकीत वेळ घालवाल. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. कष्टाला पर्याय नाही. समोरील गोष्टीचा आनंद घ्याल. नोकरदार वर्गाच्या समस्यांचे निराकरण होईल.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope )
महत्त्वाचे निर्णय घेताना अडचण येऊ शकते. ध्यानधारणा करावी. दिवसभर आत्ममग्न राहाल. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. सामाजिक हितसंबंध सुधारतील.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
शब्द देताना शहानिशा करा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. अनावश्यक चिंता करत बसू नका. जबाबदार्या वाढतील. आपल्या भावना उत्कृष्ट पद्धतीने मांडाल.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
पती पत्नीमध्ये गैरसमजाचे वारे वाहू शकतात. वेळेचे महत्त्व ध्यानात घ्या. परिस्थितीनुरूप बदलावे लागेल. कौटुंबिक वातावरण खेळते राहील. दिवसाच्या पूर्वार्धात चांगली कामे करावीत.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
अडचणीवर खंबीरपणे मात कराल. दिवस मनाजोगा घालवाल. जोडीदाराची बाजू वरचढ ठरू शकते. अति उत्साह दाखवायला जाऊ नका. नातेवाईकांचे प्रश्न सोडवावे लागतील.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
मानसिक चंचलता जाणवेल. नसती काळजी करू नका. पराक्रमाला वाव आहे. हातातील कामात यश येईल. विरोधकांचा त्रास कमी होईल.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
प्रसंग ओळखून सामाजिक कार्य करा. मुलांचे वागणे स्वतंत्र वृत्तीचे वाटेल. अंगमेहनतीची कामे कराल. दैनंदिन कामात चाल ढकल करू नका. जोडीदार तुमची इच्छा पूर्ण करेल.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
उगाच रागराग करू नका. वाणीवर ताबा ठेवणे हिताचे ठरेल. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढाल. कामाचा उरक वाढेल.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
खेळीमेळीतून सत्कार्य कराल. कामाचा जोम वाढेल. समोरील संधि ओळखायला शिका. जोडीदाराच्या प्राप्तीत वाढ होईल. व्यवहारकुशलता दाखवावी.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
अचानक धनलाभाचा योग. कौटुंबिक वातावरण स्थिर ठेवावे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. प्रकृतीत सुधारणा होईल. पथ्यपाणी चुकवू नये.