![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ सप्टेंबर २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
संगत योग्य आहे काय ह्याचा विचार करा. प्रवास संभवतात. वरिष्ठ अधिकार्याची गाठ पडेल. संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल. खर्चात वाढ होऊ शकते.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
जुने वाद संपुष्टात येतील. अंगीभूत कुशलता योग्य जागी वापरा. भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल. आपलेच मत समोरच्या व्यक्तिला पटवून द्या. दिवस आनंदात घालवाल.
मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope)
व्यायामाला नव्याने सुरवात करा. उत्तम भाषाशैली वापराल. व्यवसायात एखादा प्रयोग कराल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. बचतीच्या योजना आखाल.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
अति हळवे होऊ नका. भौतिक सुखात वृद्धी होईल. कौटुंबिक सुखात वाढ होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
तुमची लोकप्रियता वाढेल. जुने छंद जोपासावेत. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. वरिष्ठांशी योग्य ताळमेळ राहील. आत्मविश्वास वाढीस लागेल.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
श्रमाला घाबरून चालणार नाही. उगाचच कच खाऊ नका. व्यसनांपासून दूर रहा. विरोधक नरमाईने घेतील. डोकेदुखीचा त्रास संभवतो.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
अनाठायी बडबड टाळावी. झोपेची तक्रार जाणवेल. आपले वागणे लोकांना चमत्कारिक वाटेल असे वागू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराचा वरचष्मा राहील.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
आरोग्यासाठी हितकारक अशा गोष्टी लक्षात घ्या. प्रत्येक कामात उगाचच ढवळाढवळ करू नका. ज्येष्ठ व्यक्तींची गाठ पडेल. एका भेटीमुळे अनेक कामे मार्गी लागतील. रूचकर पदार्थांचा आस्वाद घ्याल.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
आपला लोकसंग्रह वाढीस लागेल. जवळचा प्रवास सुखकारक होईल. अविवेकाने वागू नका. क्रोध वृत्तीत वाढ होईल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
नवीन जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. इतरांना आनंदाने मदत कराल. गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध ठेवा. जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
खोल विचार करण्याची तयारी ठेवा. प्रलंबित कामे मार्गी लागतील. दिवस मनाप्रमाणे घालवाल. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य लाभेल.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
जोडीदाराची प्रगती दिसून येईल. कौतुकासाठी काही काळ वाट पहावी लागेल. धार्मिक कामात रस घ्याल. मौसमी आजारापासून काळजी घ्या. पथ्यपाणी चुकवू नका.
डिस्क्लेमर: वरील राशीभविष्य हे ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. यातील माहिती पूर्णपणे अचूक किंवा सत्य असल्याचा दावा केला जात नाही. महत्त्वाचे निर्णय घेताना संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.