MPSCचा निकालाबाबत नवीन निर्णय

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. ९ ऑक्टो. – मुंबई -महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकेची मूळप्रत स्कॅन करून त्यांच्या ऑनलाईन प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे निकालाबाबत साशंकता असल्यास लगेच त्याची पडताळणी होऊ शकणार आहे.

दरम्यान, एमपीएससीची रविवारी (11 ऑक्टोबर) होणारी परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाच्या नेत्यांशी गुरुवारी (8 ऑक्टोबर) दीर्घ चर्चा केली. या बैठका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.

परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचा दावा बैठकीनंतर मराठा नेत्यांनी केला. मात्र, सरकारने रात्री उशिरापर्यंत कुठलाही अधिकृत निर्णय जाहीर केला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *