महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसंस्था – दि. १३ ऑक्टो . -पुणे – सध्या सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होण्यास काही कालावधीच राहिलेला आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गातून याची मोठय़ा प्रमाणात पूर्वतयारी करण्यात येत असल्याचे पहावयास मिळत आहे. कोरोनाचा प्रभाव अद्यापही असल्याने अनेकांचा खरेदीतला कल हा ऑनलाइनच अधिक दिसतोय. याचाच परिणाम म्हणून ऑनलाईन खरेदीमध्ये या संकटकाळात जवळपास 51 टक्क्यांनी तेजी आल्याची माहिती एका सर्व्हेमधून नुकतीच देण्यात आली आहे. सदरचा सर्व्हे हा देशातील 330 जिल्हय़ांमधील तीन लाखापेक्षा अधिक लोकांच्या सहभागातून पूर्ण केला असल्याची माहिती आहे.
सन 2019 मध्ये झालेल्या स्थानिक सर्कलमध्ये ग्राहकांची ऑनलाईन संख्या ही 27 टक्के होती. यातही प्राथमिक प्राधान्यक्रम हा ऑनलाईन खरेदीकडे राहिल्याची नेंद केली आहे. या तुलनेत सामाजिक वातावरणातील बदलाचा विचार करता, ऑनलाईनच्या माध्यमातून विविध क्षेत्रांना प्राधान्य देण्यावर भर दिला जात आहे.
ई कॉमर्सकडे ओढा
वर्ष 2020 मधील सणासुदीच्या वातावरणात स्थानिक पातळीवरील एका सर्वेक्षणानुसार मोठय़ा प्रमाणात ऑनलाईन खरेदी-विक्री वेगाने वाढत गेली आहे.
सदरची खरेदी विक्री ई कॉमर्सच्या विविध साईट्सचा वापर करुन केली आहे. याच्यासह लघु, मध्यम व कुटीर उद्योगामधील खरेदीचा विचार केल्यास जवळपास80 टक्के लोकांनी ऑनलाईन मार्ग स्विकारला आहे.