कोकणवासीयांसाठी सरसावल्या अनेक कंपन्या, अजित पवारांनी केले विशेष मार्गदर्शन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसंस्था – दि. १३ ऑक्टो . – मुंबई -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील जनतेला आरोग्य विषयक सोयी सुविधांचा अभाव होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष दिले आहे. यासाठी अजित पवार यांच्या मार्गदर्शनासाखली अनेकांनी सीएसआर फंडातून प्रायोगिक तत्त्वार प्रकल्प उभा केला असून त्यामुळे याठिकाणी पायाभूत सोयी सुविधांचे आधुनिकरण करण्यासाठी आणि येथील रुग्णालयांत ऑक्सिजन क्षमता वाढविण्यास मदत मिळाली आहे.

या प्रकल्पाअंतर्गत हिंदुस्थानात प्रथमच सब डिस्ट्रिक्ट रुग्णालयांमध्ये डय़ुरा सिलिंडरवर आधारित हाय कपॅसिटी ऑक्सिजन सिस्टिम बसविण्यात आल्या आहेत. यासाठी कौस्तुभ बुटाला यांचे विशेष योगदार राहिले असून बुटाला हे उपमुख्यमंत्र्यांच्या कोविड -19 या विभागात कार्यरत आहेत. त्याचबरोबर बंधन बँकेच्या सीएसआर फंड आणि स्टेट ऑफ आर्ट या संस्थेच्या माध्यमातून खेड नगर परिषदेला अत्याधुनिक अशी कार्डियाक रुग्णवाहिका देणगी स्वरुपात मिळाली असून यासाठी आदित्य मराठे यांनी विशेष लक्ष दिले आहे.

खेड नगरपरिषदेसाठी स्वतःचे कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय अंमलात आणला आहे. याआधीच परिषदेने 3 नॉन कोविड वॉर्ड तयार केले असून आणि कोविड-19 करिता 18 बेडची स्वतंत्र व्यवस्था वेगळ्या इमारतीमध्ये करण्यात आली आहे. रेकॉर्ड ब्रेक कालावधीत हे सारे उभारण्यात आले असून यासाठी मुख्य अधिकारी प्रसाद शिंगणे यांनी दिवस रात्र मेहनत घेतली. खेड जवळ असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन संदर्भातील व्यवस्था एचडीएफसी बँकेच्या सहकार्यामुळे शक्य झाली आहे. कोकणी मुस्लिम संघटनेने सहा महिन्यांकरिता डॉक्टर्स आणि परिचारकांच्या मानधनाच्या खर्चाचा भार उचलला आहे. शिवाय एचडीएफसी बँकेने लवकरच पॅथॉलॉजिकल लॅब व एक्सरे मशीन करिता डिजिटायझर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *