” स्मार्ट सिटी” ; नियोजन बद्ध विकसित केलेल्या भागातही पाण्याचा त्रास ; पि.के.महाजन.

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २४ ऑक्टो – पि.चि .शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे भरली असूनही महानगरपालिकेचे पाणी वाटपाचे नियोजन बरोबर नसल्यामुळे पिपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे . पुरेसा साठा असुनही दिवसा आड पाणी सोडने मागचे काय कारण आहे? पाण्याचा साठा असुनही पाण्याचा दुष्काळ का तयार केला जात आहे? मग खरोखर पाणीसाठा कमी होईल तेव्हा दोन चार दिवसाआड पाणी सोडणार का?

भरपुर पाणी असूनही पाणी जाते कुठे? असे अनेक प्रश्न समोर येतात, आम्ही शहरात राहतो की खेडयात हेच कळत नाही!! नियोजन बद्ध विकसित केलेल्या भागातही पाण्याचा त्रास होत असेल तर कसे काय या शहराला ” स्मार्ट सिटी” म्हणायचे? दिवसा आड पाणी तेही कमी दाबाने असल्या कारणाने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही…….तरी या समस्येकडे पि. चि. मनपा चे जबाबदार अधिकारी व आयुक्त साहेब यांनी लक्ष घालून हि समस्या सोडवावी हिच अपेक्षा……पि.के.महाजन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *