जनतेचा भ्रमनिरास होणार नाही असे कामकाज केंद्र सरकार ने करावे अशी अपेक्षा ; पि.के.महाजन.

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २४ ऑक्टो – एखाद्या विषयावर मत प्रकट करणे किंवा एखादा प्रश्न विचारने भा.ज.पा.मध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांना आवडत नाही असे स्पष्ट करत माननीय नाना पाटोलेंनी 2017 मध्ये आपल्या खासदारकीचा राजीनामा देवून भा.ज.पक्ष सोडला आहे जे आता महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष आहेत……आणि आता ज्यांनी आपल्या जिवणाचे 40 वर्ष प्रामाणिक पणे काम करून महाराष्ट्रात भा.ज.पक्ष उभा केला आहे असे माननीय नाथाभाऊंनी पक्ष सोडला आहे. महाराष्ट्राच्या या दोन दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला तरी यांची साधी मनधरणी ही कोणी वरीष्ठ नेत्यांनी केली नाही.

यावरून या पक्षाची भूमिका कोणत्या दिशेने चालली आहे हे लक्षात येते.कोणतेही सामाजिक मंडळ संस्था, संघटना असो की राजकीय पक्ष असो जेथे खाजगी विषय नाही अशा ठिकाणी कोण्याही एकाची मनमानी चालत नाही सर्वाना आपली भुमिका मांडण्याची संधी देवून विचार विनीमय करून त्यानंतर बहुमताने योग्य तो निर्णय घेवून त्या ठिकाणी कामकाज चालवले तरच ती संघटनां किंवा राजकीय पक्ष योग्य पद्धतीने काम करू शकते अन्यथा सदर संघटना किंवा पक्ष हळुहळु लयाला जात असतो

त्याच बरोबर सदर संघटनेशी व पक्षांशी निगडित पदाधिकारी, नेते व सर्व सदस्यांचे नुकसान होत असते शेवटी शेवटी आपापसातल्या मतभेदांना सदर संघटनांना पक्ष नुसताच नावाला उरतोय कारण त्यांच्या कडूनं जनते साठी उपयुक्त व भरीव कामगिरी होत नसते अशी अवस्था एके दिवशी भा.ज.पा. ची होऊ शकते. देशाला चालवणारा पर्यायी पक्ष असावा या उद्देशाने देशातील जनतेने भा.ज.पा.ला भरभरून प्रतिसाद देवून सत्ता दिलेली आहे, त्या मुळे जनतेचा भ्रमनिरास होणार नाही असे कामकाज भा.ज.पा. सरकार ने करावे अशी अपेक्षा आहे …….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *