महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – दि. 4 नोव्हेंबर – कोरोनाच्या काळापासून दिव्यांग बांधवांचा रोजगार पूर्णपणे बंद आहे. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना बाहेर फिरू स्वतःचा व्यवसाय करणे किंवा कामावर जाणे शक्य होत नाही. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात त्यांचे कामही पूर्णपणे बंद झालेले आहे.
त्यांना या वर्षाची दिवाळी करणे शक्य नाही, तरी दिव्यांग बांधवास दिव्यांग निधीतून विशेष तरतूद करून दिवाळी भेट म्हणून पाच हजार रुपये देण्याची मागणीचे निवेदन अपंग सेलचे पदाधिकारी अशोक कुंभार, आनंद बनसोडे, महेश वाघ, बाळासाहेब तरस,विजय शिंगे,रवी भिसे,नागेश काळे,अशोक सोनावणे,हरेश्वर गाडेकर,योगेश सोनार,सुधाकर कांबळे यांनी केली आहे.