पुण्यातलं सर्वात मोठं कोविड सेंटर बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ७ नोव्हेंबर – पुणे :पुण्यातले सर्वात मोठं कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुणे महापालिकेनं हे सर्वात मोठं कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून हे कोविड सेंटर बंद करण्यात येणार आहे. या कोविड सेंटरची मर्यादा साडेतीन हजार आहे. पुणे महापालिका आणि सामाजिक संस्थेच्या मदतीने हे कोविड सेंटर चालवलं जात होतं. मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने हे कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

सध्या पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये देखील ८०० बेड पैकी ६०० हून अधिक बेड रिकामे आहेत. कोरोनाची रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुण्यात उभारण्यात आलेलं जम्बो कोविड केअर सेंटर मधील ही सहाशेहून अधिक बेड सद्यस्थितीत रिकामे आहेत. त्यामुळे महापालिकेने हे साडेतीन हजार क्षमतेचं कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान पुणे शहरात गुरुवारी १६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर २२८ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पुणे शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ६२ हजार ६४७ एवढी झाली आहे. आजवर १ लाख ५२ हजार ८४१ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. पुणे महापालिकेने यासंदर्भातली माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *