BSNL च्या जबरदस्त प्लान 3300GB डेटा आणि 60Mbps स्पीड, किंमत ५९९ रुपये

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. १२ नोव्हेंबर – बीएसएनएल युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने हाय स्पीड इंटरनेट ऑफर करणाऱ्या प्लान्सची डिमांड करताना ५९९ रुपयांच्या नव्या प्लानला लाँच केले आहे. कंपनीने या ब्रॉडबँड प्लानचे नाव ‘Fiber Basic Plus’ ठेवले आहे. बीएसएनएलचा हा लेटेस्ट ब्रॉडबँड प्लान एअरटेलच्या ४९९ रुपयांच्या एक्स्ट्रीम फायबर प्लानला टक्कर देणार आहे. जाणून घ्या बीएसएनएलच्या या नवीन प्लानसंबंधी.

हे बेनिफिट मिळतात
बीएसएनएलच्या या प्लानमध्ये युजर्संना 60Mbps च्या स्पीड सोबत ३३०० जीबी डेटा मिळतो. कंपनी या प्लानला अनलिमिटेड डेटा बेनिफिटच्या प्लान समजून प्रमोट करीत आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर मिळणारी इंटरनेट स्पीड कमी होऊन ती 2Mbps होते. या प्लानसोबत युजर्संना देशभरात कोणत्याही नेटवर्कसाठी २४ तासांची अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट दिली जाते. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनी या ब्रॉडबँड प्लानमध्ये फ्री ओटीटी सब्सक्रिप्शन देत आहे की नाही यासंबंधी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

४४९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान
बीएसएनएल आपल्या ४४९ रुपयांच्या फायबर बेसिक प्लानला रिवाईज करीत आहे. अंदमान निकोबार सोडून बीएसएनएल हा प्लान सर्व शहरात ऑफर करीत आहे. सुरुवातील कंपनी या प्लानमध्ये केवळ निवडक शहरात ही ऑफर करीत होते. या प्लानमध्ये 30Mbps च्या स्पीड सोबत ३३०० जीबी डेटा मिळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *