मुकेश अंबानींची मोठी घोषणा ; देशात लवकरच ‘५ जी’ची क्रांती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ९ डिसेंबर – भारतीय बाजारपेठेत ‘५ जी’च्या स्मार्टफोननी रुंजी घालायला सुरुवात केली आहे. २० ते ३० हजारांत वनप्लस, मोटरोला, व्हिवोचे स्मार्टफोन लाँच झाले आहेत. कोणाचा स्मार्टफोन किती स्वस्त, त्यामध्ये प्रोसेसर कोणता आदी चर्चा होत असतानाच देशात ‘५ जी’ नेटवर्क कधी सुरु होणार याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे. यावर रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी दुस-या सहामाहीत भारतात रिलायन्स जिओ ‘५ जी’ सेवा लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. तसेच यासाठी काही नीतिगत बदल आणि प्रक्रियेमध्ये वेग आणण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. जेव्हापर्यंत सोपे धोरणात्मक बदल आणि प्रक्रियेमध्ये वेग व स्वस्त बनविले जाणार नाही, तोपर्यंत हे शक्य नाहीय, असेही ते म्हणाले.

2021 मध्ये जिओ भारतात ‘५ जी’ ची क्रांती घेऊन येणार आहे. संपूर्ण नेटवर्क स्वदेशी असेल. याशिवाय हार्डवेअर आणि टेक्नॉलॉजीदेखील स्वदेशीच असणार आहे. जिओच्या माध्यमातून आम्ही आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहोत. भारताला ‘५ जी’ स्पेक्ट्रमवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. सोबतच जिओ ही ‘५ जी’ क्रांतीची लीडर ठरणार आहे. येत्या काही दिवसांत भारतात सेमी कंडक्टरचा उत्पादन हब होण्याची शक्यता आहे. आम्ही सेमी कंडक्टरच्या आयातीच्या भरवशावर राहू शकत नाही, असेही मुकेश अंबानी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *