वर्ष 2020 – सिनेसृष्टीसाठी अतिशय दु:खदायक ठरलं या कलाकारांचं आकस्मित निधन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १० डिसेंबर – 2020 हे वर्ष बॉलिवूडसाठी फारच दु:खाचं ठरलं. लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टी ठप्प झाली होती आणि महत्वाचं म्हणजे, बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचं निधन आणि आत्महत्या. या वर्षभरात अनेक कलाकार आपल्याला सोडून गेले.

*29 एप्रिल 2020 रोजी अभिनेता इरफान खानचं निधन झालं. वयाच्या 54 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. कॅन्सरमुळे तो 2 वर्ष त्रस्त होता.

*इरफानच्या निधनानंतर अगदी एकाच दिवसाने बॉलिवूडला दुसरा धक्का बसला तो ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांच्या निधनामुळे. मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं. 67 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

*प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांनी 1 जून रोजी जगाला निरोप घेतला. वाजिद खान मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होता आणि प्रकृती बिघडल्यानंतर त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी त्याच्या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले.

*सुशांतसिंग राजपूतने 14 जून रोजी मुंबईच्या त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला.

*कोरिओग्राफर सरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे जुलैमध्ये निधन झालं. त्यांच्या नृत्य दिग्दर्शनामुळे बॉलिवूडच्या चित्रपटातील गाणी अधिक सुंदर रित्या पडद्यावर दिसली.

*ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं 22 सप्टेंबर 2020 रोजी कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झालं.

*ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन (Ravi Patwardhan) यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. शनिवारी रात्री 5 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले.

*7 डिसेंबर 2020 ची सकाळ झाली तीच दिव्या भटनागरच्या निधनाच्या बातमीने. कोरोनामुळे ती त्रस्त होती. ये रिश्ता क्या कहलाता हैं या मालिकेत तिने भूमिका केली होती.

*अभिनेत्री VJ चित्रा (VJ Chitra) हिने आत्महत्या केली आहे. तिच्या मृत्यूमुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या 28 वर्षांच्या चित्राच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. चेन्नईतील एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *