कॅनडात कोरोनाच वेगळेच प्रकरण समोर आलं ; गेल्या नऊ महिन्यापासून ‘ती’ लढतेय कोरोनाविरुद्ध

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १२ डिसेंबर -गेल्या डिसेंबरपासून जगभर कोरोना साथीचा (Corona Pendemic) हाहाकार सुरूच आहे. कोरोना विषाणूच्या संपर्कात आलेले बरेचसे लोक बरे होत आहेत. भारतातही रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. पण तरीही या गंभीर आजारामुळे मृत्युमुखी (Corona Deaths) पडणाऱ्यांची संख्या कमी नाही. कोरोना मृत्यू हा अजूनही जगभरात चिंतेचा विषय आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर काही रुग्णांच्यात गुंतागुंतीचे आजार दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे कित्येक महिनेही उपाचारांसाठी लागत आहेत. कॅनडात असंच एक प्रकरण समोर आलं.

कॅनडामधील (Canada) एका महिलेचं प्रकरण काहीसं वेगळच आहे. तिला नऊ महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ती अजूनही कोरोनाच्या आजारातून मुक्त होऊ शकली नाही. कॅनडाच्या या 35 वर्षीय महिलेचं नाव अ‍ॅशले अँटोनियो (Ashley Antonio) असं आहे. ती गेल्या 9 महिन्यांपासून कोरोनामुळे त्रस्त आहे. इतके दिवस उलटून गेल्यानंतरही कोरोनाने तिचा पिच्छा सोडला नाही.

तिचं असं म्हणणं आहे, की कोरोना मला कधीही सोडणार नाही. अँटोनियो यांना डोकेदुखी, फुफ्फुसांचा आजार, चक्कर येणे, हृदय जोरात धडधडणे आणि सांधेदुखीसह विविध प्रकारचे गुंतागुंतीचे आजार आहेत. अँटोनियो यांनी पुढे सांगितलं की ‘कधीकधी मला बरं वाटतं आणि अचानक मला श्वासही घेता येत नाही आणि मी हालचाल करू शकत नाही. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून लवकरच त्या बऱ्या होतील अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *