वाहतूक नियमभंग; आता चौथ्यांदा दंड झाल्यास चालकाचे लायसन्स निलंबित

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १२ डिसेंबर -वाहतूक नियमभंग केल्याबद्दल चौथ्यांदा दंड झाल्यास संबंधित वाहन चालकाची अनुज्ञप्ती (लायसन्स) सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वाहतूक पोलिसांनी चौथ्यांदा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या सुमारे दोन हजार चालकांचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. लायसन्स रद्द का केले जाऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीसही वाहतूक पोलीस संबंधित चालकांना बजावणार आहेत.

वाहतूक पोलीस विभागाचे सहआयुक्त यशस्वी यादव यांनी या माहितीस दुजोरा दिला. लायसन्स निलंबित करण्याची प्रक्रि या सुरू राहील. पहिल्या टप्प्यात दोन हजार अनुज्ञप्ती निलंबित करण्याबाबत आरटीओकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तीनपेक्षा जास्त वेळेस नियम मोडलेल्या चालक शोधून त्यांचेही परवाने निलंबित करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात येईल. वाहनचालकांनी नियमांचे पालन कटाक्षाने करावे, रस्त्यावर पोलीस नाहीत हे पाहून नियम मोडण्याचे धाडस करू नये, हा या कारवाईमागील उद्देश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ई चलन प्रणाली सुरू झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी प्राधान्याने वाहतूक नियमनाकडे लक्ष केंद्रित केले. तर नियम मोडणा-या चालकांवरील कारवाई किं वा दंड आकारणी सीसीटीव्ही कॅ मे-यांआधारे के ली जाऊ लागली. नियमभंग करणारे वाहन आढळल्यास नोंदणी क्र मांकाचे छायाचित्र काढून त्याआधारे वाहन मालकाचे तपशील शोधून त्याला ईमेल किं वा लघुसंदेशाद्वारे ई चलन पाठवले जाते. पूर्वी वाहतूक पोलीस वाहन अडवून जागच्या जागी दंड वसूल करत. पैसे नसल्यास चालकाची अनुज्ञप्ती किं वा अन्य कागदपत्रे जप्त करत. ती सोडवून घेण्यासाठी चालकाला चौकी किं वा मुख्यालयात यावे लागे. चालक चौकीत न आल्यास हे प्रकरण न्यायालयात दाखल के ले जाई. ई चलन प्रणालीमुळे दंड भरण्याची सक्ती, वाहन किं वा अनुज्ञप्ती जप्ती होत नसल्याने वाहनचालक बेशिस्त झाले. असे लक्षात आल्याने चालकांना वाहतूक नियम मोडल्यास काय होऊ शकते याची जाणीव करून देण्यासाठी ही कारवाई हाती घेतल्याचे अन्य एका अधिका-याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *