ह्या राज्यातील नागरिकांना मोफत दिली जाणार कोरोना प्रतिबंधक लस ; मुख्यमंत्री यांची घोषणा

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ डिसेंबर – केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी एक मोठी घोषणा करत राज्यातील लोकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिली जाणार असून लसीच्या तातडीच्या वापरासाठी डीसीजीआयकडे अनेक लसीची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी परवानगी मागितली असली तरी सरकारने अद्यापपर्यंत कोणत्याही लसीला परवानगी दिलेली नाही.

अमेरिकेच्या फार्म सेक्टर कंपनीतील दिग्गज फायझरसह सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) कोरोना प्रतिबंधक लस ‘कोव्हिशिल्ड’ या देशात विकसित लसीच्या आपातकालीन वापरासाठी डीसीजीआयकडे मान्यता मागितली आहे.

या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री विजयन यांनी केले आहे. त्याचबरोबर काळजी घेतली नाही तर राज्याची अवस्था आणखी बिकट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *