असे आहेत आजचे पेट्रोल-डिझेलचे दर,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ डिसेंबर – पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये आज सहाव्या दिवशी कोणता बदल झाला नाहीय. याआधी पेट्रोल डिझेलच्या किंमती सलग ६ दिवस वाढत राहील्या. आज तेल मार्केटींग कंपन्यांनी किंमतीत कोणता बदल केला नाहीय. दरम्यान २० नोव्हेंबरपासून आतापर्यंत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर १७ वेळा वाढवले. दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत या १७ दिवसात २.६५ रुपये प्रति लीटरने वाढली. तर डिझेलची किंमत ३.४० रुपये प्रति लीटरने वाढली. याआधी सप्टेंबर २०१८ मध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव इतके वाढले होते.

आज सहाव्या दिवशी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर ८३.७१ रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबईत ९०.३४ रुपये लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर ८५.१९ रुपये तर चेन्नईमध्ये ८६.५१ रुपये प्रति लीटर आहे.

याप्रमाणे डिझेलचे दर देखील बदलताना दिसतायत. दिल्लीमध्ये डिझेल आजही ७३.८७ रुपये प्रति लीटर आहे. मुंबईमध्ये डिझेलच्या तर ८०.५१ रुपये प्रती लीटर तर कोलकातामध्ये डिझेलचा दर ७७.४४ रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्ये डिझेलचा दर ७९.२१ रुपये प्रति लीटर आहे.


पेट्रोल डिझेलच्या किंमती तुम्हाला एसएमएसच्या माध्यमातून देखील कळू शकतात. इंडियन ऑईलने सुविधा दिलीय की तुम्ही मोबाईलवरुन RSP आणि तुमच्या शहराचा कोड लिहून ९२२४९९२२४९ नंबरवर पाठवा. तुमच्या मोबाईलवर तात्काळ पेट्रोल आणि डिझेलचा दर येईल. प्रत्येक शहराचा दर वेगवेगळा आहे. इंडीयन ऑईल कंपनीच्या वेबसाईटवर हा पहायला मिळेल.

रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर सुरु होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साईज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर बाबी जोडल्यानंतर याचा दर जवळजवळ दुप्पट होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *