अजिंक्य रहाणेची कप्तानी खेळी , भारताची आघाडी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २७ डिसेंबर -मेलबर्न येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने भारताच्या दोन विकेट घेत कमबॅक केले. भारताचे नाबाद फलंदाज शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या दिवशी २५ धावांची भर घातली. पण, पॅट कमिन्सने अर्धशतकाच्या जवळ पोहचलेल्या शुभमन गिलला ४५ धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. त्यानंतर कमिन्सनेच चेतेश्वर पुजाराचा ( १७ ) अडसर दूर करत भारताची अवस्था १ बाद ६० वरुन ३ बाद ६४ अशी केली.

पाठोपाठ दोन विकेट पडल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी लंच पर्यंत कांगारुंना कोणतेही यश मिळवू न देता संघाला शतकाच्या जवळ पोहचवले. पण, लंचनंतर धावांची गती वाढवण्याच्या नादात हनुमा विहारी २१ धावांवर बाद झाला. विहारी बाद झाल्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत संघाला १५० चा टप्पा पार करुन दिला. दुसऱ्या बाजूने संयमी खेळी करत होता.

रहाणे आणि पंतने पाचव्या विकेटसाठी ५७ धावांची भागिदारी रचली. दरम्यान, कर्णधार अजिंक्य रहाणेने आपले अर्धशतक पू्र्ण करुन घेतले. अखेर डावखुऱ्या स्टार्कने २९ धावांवर खेळणाऱ्या पंतला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर रहाणेने डावाची सुत्रे आपल्या हातात घेतली. पण, भारत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या १९५ धावांच्या ६ धावा मागे असताना पावसाने सुरुवात केली. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला. दरम्यान, पंचांनी टी टाईमही घोषित केला.

लाईव्ह अपडेट :

भारताच्या ६६ षटकात ५ बाद १९८ धावा

चहापानानंतर भारताची ऑस्ट्रेलियावर आघाडी घेण्यास सुरुवात

पंचांनी टी टाईम घोषित केला

सामन्यात पावसाचा व्यत्यय, खेळ थांबला

भारताच्या ६३.३ षटकात ५ बाद १८९ धावा

भारताला पाचवा धक्का, आक्रमक फलंदाजी करणारा पंत २९ धावा करुन बाद

भारताच्या ५१ षटकात ४ बाद १३५ धावा

भारताला चौथा धक्का, हनुमा विहारी २१ धावा करुन बाद

भारताच्या ४१ षटकात ३ बाद १०० धावा

लंच ब्रेकपर्यंत भारताच्या ३७ षटकात ३ बाद ९० धावा

भारताच्या २४ षटकात ३ बाद ६४ धावा

सकाळच्या सत्रात कमिन्सचे भारताला दोन धक्के, पुजारा १७ धावा करुन माघारी

शुभमन गिलचे अर्धशतक हुकले, कमिन्सने ४५ धावांवर केले बाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *