शेतकरी आंदोलन दिवस 32 वा ; मोदींच्या ‘मन की बात’ला शेतकऱयांचा असाही विरोध; थाळी वाजवा, कृषीकायदे पळवा!

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २८ डिसेंबर – शेतकऱयांच्या प्रश्नाबाबत मोदी सरकारला अजून पाझर फुटलेला नाही. याच्या निषेधार्थ शेतकऱयांनी रविवारी कंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला टाळ्या-थाळ्या वाजवून तीव्र विरोध केला. कंतप्रधानांनी म्हटले होते की, थाळ्या वाजवून कोरोना पळेल. त्याप्रमाणे शेतकरी थाळ्या वाजवताहेत, जेणेकरून कृषी कायदे हटवले जातील, असा टोला किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिपैत यांनी लगावला. सरकारने वेळीच सुधारावे, असा इशाराही त्यांनी दिला.


शेतकऱयांच्या हक्कांवर नांगर फिरवणाऱया कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी मागील 32 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी आंदोलन तीव्र केले जात आहे. यादरम्यान रविवारी मोदींच्या ‘मन की बात’ला विरोध दर्शवण्यात आला. हा कार्यक्रम सुरू होताच शेतकऱयांनी हातात घेतलेले ड्रम, थाळ्या जोरजोरात वाजवण्यास सुरुवात केली. सरकार जोपर्यंत नवे कृषी कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत आम्ही कंतप्रधान मोदींचा अशाच प्रकारे विरोध करणार, अशी रोखठोक भूमिका शेतकऱयांनी मांडली. सरकारने अडवणुकीची भूमिका तत्काळ सोडावी, कारण सशर्त चर्चेला काहीच अर्थ नाही. जर कायदे मागे घेतले जात नसतील, तर आंदोलक शेतकरीसुद्धा माघारी घरी जाणार नाहीत, असे शेतकरी नेते राकेश टिपैत यांनी सरकारला सुनावले. नवे वर्ष सर्वांसाठीच चांगले ठरू दे. मोदीजींनी कृषी कायदे मागे घ्यावेत, त्यामुळे आम्हा शेतकरी बांधवांनाही नवीन वर्ष चांगले जाईल, असे ते म्हणाले. क्रांतिकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी 30 डिसेंबरच्या ‘ट्रक्टर मार्च’मध्ये देशभरातील शेतकऱयांना सहभागी होण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *