महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ७ जानेवारी -कोरोना काळात चिकन आणि अंड्यांच्या घटलेल्या मागणीमुळे २०२० च्या पहिल्या सहामाहीत ताेटा सहन केल्यानंतर कुक्कुटपालन उद्योग दुसऱ्या सहामाहीत आला आला होता तोच बर्ड फ्लूच्या घटनांनी पुन्हा एकदा कुक्कुट पालन व्यवसायाची धास्ती वाढली आहे. कोंबड्यांत बर्ड फ्लूची लक्षणे न दिसल्यानंतरही दोन दिवसांत ठोक बाजारात चिकन आणि अंड्याच्या किमतीत १० % घसरण आली आहे. बर्ड फ्लूची प्रकरणे वाढल्यास पुन्हा एकदा चिकन व अंड्यांची मागणी घटेल आणि उद्योगाला नुकसान सोसावे लागू शकते, अशी भीती व्यावसायिकांना आहे.
व्यावसायिकांनुसार, सध्या चिकन व अंड्यांच्या मागणीत घट आली नाही. मात्र, धारणा बिघडल्याने भाव पडले आहेत. मात्र, बर्ड फ्लू प्रकरणे वाढल्यास नुकसान वाढू शकते. पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाचे खजिनदार रिकी थापर म्हणाले, सध्या केवळ कावळे आणि बदकांत बर्ड फ्लू दिसून येत आहे. यापुढे स्थितीवर ती अवलंबून असेल. दुसरीकडे, केंद्रीय पशुपालन मंत्री गिरिराज सिंह यांनी बुधवारी लोकांनी घाबरू नये, असे आवाहन केले आहे. केरळमध्ये बदक वगळता बर्ड फ्लू आतापर्यंत वन्य पक्षांमध्ये दिसला आहे.