स्मिथचं २७ वं कसोटी शतक; दीड वर्षानंतर स्मिथची शतकी खेळी,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ८ जानेवारी -बॉर्डर-गावसकर मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात अपयशी ठरणाऱ्या स्टिव्ह स्मिथनं तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात शतकी खेळी केली आहे. सप्टेंबर २०१९ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथनं लगावलेलं हे पहिलेच शतक आहे. २०० चेंडूचा सामना करताना स्मिथनं शतकी खेळी केली. एका बाजूनं विकेट पडत असताना स्मिथनं एकट्यानं खिंड लढवली. स्मिथचं कसोटीमधील हे २७ वं शतक आहे.

दुसऱ्या दिवशी एका बाजूनं विकेट पडत असताना स्मिथनं पहिल्यांदा ११६ चेंडूत सात चौकारांच्या मदतीनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर २०० व्या चेंडूवर १४ चौकारांच्या मदतीनं शतक पूर्ण केलं. जवळपास दीड वर्षानंतर स्मिथनं कसोटीत शतक झळाकवलं आहे. याआधी सप्टेंबर २०१९ मध्ये इंग्लंडविरोधात २११ धावांची खेळी केली होती. त्यानंतर स्मिथला एकही शतकी खेळी करता आली नव्हती.

स्मिथनं शतकी खेळी करत भारतीय कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला आहे. स्मिथनं १३६ व्या डावांत २७ वं शतकं झळकावलं आहे. विराट कोहलीला २७ शतकं झळकावण्यासाठी १४१ डाव लागले होते. स्मिथनं पाच डाव आधीच हा विक्रम मोडीत काढला. सर्वात कमी डावात २७ शतकं झळकावण्याचा विक्रम डॉन ब्रडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी फक्त ७० डावांत २७ शतकं झळकावली आहेत.

Fewest inns to 27 Test hundreds

Bradman 70
STEVE SMITH 136
Kohli 141
Tendulkar 141
Gavaskar 154
Hayden 157

एका बाजूनं विकेट पडत असताना स्मिथनं खिंड लढवली आहे. लाबुशेनसोबत महत्वाची १०० धावांची भागिदारी केली. लाबुशेन बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढासळली. लाबुशेन-स्मिथ यांच्या खेळीच्या बळावर या मालिकेत ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच २०० धावांचा पल्ला पार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *