महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ८ जानेवारी -फ्लिपकार्ट या भारतातील ऐतद्देशीय बाजारपेठेने आपल्या मंचावर मराठी भाषा सादर करून आपल्या प्रादेशिक भाषेच्या सेवेला अधिक बळकटी दिली आहे. मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांची बोली भाषा आहे. यासह फ्लिपकार्ट अॅप आता इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलुगु अशा सहा महत्त्वाच्या भाषा वापरकर्त्यांंसाठी उपलब्ध झाली आहे. यामुळे भारतीय ग्राहकांसाठी ई-कॉमर्स अधिक सर्वसमावेशक सहज उपलब्ध करून देण्याची बांधिलकी अधिक बळकट होत असल्याचे फ्लिपकार्टने स्पष्ट केले आहे.
वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. लाखो फ्लिपकार्ट वापरकर्त्यांंना वैयक्तिक आणि बोली भाषेतील अनुभव देण्यासाठी ५४ लाखांहून अधिक शब्दांचे कंपनीमार्फत भाषांतर आणि लिपित लेखन करण्यात आले आहे. ई-कॉमर्स मंचाच्या ‘लोकलायझेशन अॅण्ड ट्रान्सलेशन प्लॅटफॉर्म‘वर उपलब्ध ही सुविधा ग्राहकांना सहजसुंदर अनुभव देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
फ्लिपकार्टचे मुख्य अधिकारी (उत्पादन आणि तंत्रज्ञान) जयेंद्रन वेणुगोपाल यांनी सांगितले की, भारतातील ग्राहकांसमीप ई-कामॅर्स अधिक आणणे व त्यात नाविन्यता आणणे या आमच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही गेल्या दोन वर्षांत प्रादेशिक भाषांचा व्याप लक्षणीय वाढवला आहे. आमच्या व्यासपीठावरील सहा प्रादेशिक भाषांमध्ये मराठीचा समावेश करणे म्हणजे ई-कामॅर्स अधिक सर्वसमावेशक करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे आणि भाषेचे अडसर दूर करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असेल.