महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १७ जानेवारी- ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील (Australia vs India 4th Test) दुसऱ्या दिवसाचा खेळ काल पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे काही ओव्हर्सचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे त्या खेळाची भरपाई होण्यासाठी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला (आज) लवकर सुरुवात झाली. दरम्यान, आज सकाळी कालच्या 2 बाद 62 धावांवरुन भारताने सुरुवात केली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने धावफलक हलता ठेवून चांगली भागिदारी रचण्यास सुरुवात केली. दोघांनी 45 धावांची भागिदारी करत धावफलकावर टीम इंडियाच्या 105 धावा लावल्या. परंतु सकाळच्या सत्रात भारताने पुजाराची विकेट गमावली. पुजारा 25 धावांवर जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर ठराविक वेळेने रहाणे , ३७ , मयांक ३८,पंत २३, असे बाद झाले .
तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने ठराविक विकेट्स गमावले. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. त्यामुळे टीम इंडियाची 6 बाद 186 अशी स्थिती झाली. मात्र यानंतर पदार्पण केलेल्या शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या सत्रापर्यंत ६ बाद २७२ पर्यंत धावफलक आणला. शार्दूल ठाकूर ४६ आणि वॉशिंग्टन सुंदर ४५ धावांवर खेळत आहेत या जोडीकडून टीम इंडियाला आणखी मोठ्या भागीदारीची अपेक्षा असणार आहे.