महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १७ जानेवारी-नव्या पॉलिसीवरून युजरमध्ये पसलेली नाराजी आणि प्रायव्हसीवरून संशयाचे वातावरण यामुळे व्हॉट्सअॅपने अखेर माघार घेतली आहे. तूर्ताल प्रायव्हसी पॉलिसी पुढे ढकलण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे8 फेब्रुवारीपासून कोणत्याही युजरचे अकाऊंट बंद होणार नाही, अशी माहिती आज कंपनीच्यावतीने सोशल मिडियावरून देण्यात आली आहे. त्यामुळे जगभरातील कोटय़वधी युजर्सना दिलासा मिळाला आहे.
नववर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी जाहीर करत जगभरातील कोटय़वधी युझर्सना धक्का दिला होता. त्यानुसार, नवीन पॉलिसी मान्य न केल्यास 8 फेब्रुवारी 2021 पासून व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद होईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, यानंतर जगभरातील युझर्सनी या नवीन प्रायव्हसी पॉलिसीला जोरदार विरोध केला होता. अनेक युजर्सनी व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून सिग्नल, टेलिग्रामसारख्या अॅपला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. अखेर पॉलिसीवरून चौफेर होणारी टीका आणि विरोधानंतर व्हॉट्सअॅपने आता एक पाऊल मागे घेत नवीन प्रायव्हसी पॉलिसी लागू करण्याचा निर्णय तूर्तास पुढे ढकलला आहे.नवीन पॉलिसीबाबत काही दिवसांपूर्वीच कंपनीने स्पष्टीकरण दिले होते. तुमचे प्रायव्हेट चॅटिंग पूर्णपणे सुरक्षित असून तुमच्या प्रायव्हसीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. नवीन पॉलिसी ही बिझनेस अकाऊंट डोळ्यासमोर ठेवून बनवली आहे, असे कंपनीने म्हटले होते.
युजरमधील गैरसमज दूर करणार!