महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १८ जानेवारी-राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात १थ हजार पदांची भरती होणार असून त्यापैकी ८ हजार ५०० पदांच्या भरतीची जाहिरात सोमवारी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र काही ठिकाणी कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे यंत्रेणेवर मोठा ताण आला होता. त्यामुळे राज्यातील सार्वजिनक आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी १७ हजार पदांची भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात साडे आठ हजार पदांची भरती प्रकिया उद्यापासून सुरू होत असल्याचे टोप यांनी सांगितले.