राज्यात ‘बर्ड फ्लू’चा धोका अजून टळला नाही : पाच मोरांचा अचानक मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २३ जानेवारी – कोरोनानंतर राज्यात बर्डफ्लूनं थैमान घातले आहे. अशात बीड (Beed) जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातल्या लोणी शिवारात (Loni Shivar) पाच मोरांचा अचानक मृत्यू (Peacocks Death) झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात तीन मोर आणि दोन लांडोरींचा यात समावेश आहे. (5 peacocks found dead in Loni Shivar)

एका शेतामध्ये हे मोर मरण पावल्याचे आढळून आले आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार यातील एक मोर जीवंत होता, मात्र काही वेळाने त्याचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्यानंतर घटनास्थळी शिरूरचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.

मृत मोरांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर मोरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकेल, अशी माहिती पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, बर्ड फ्लूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे ही घटनासमोर आल्याने अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील मदुरंतकम येथे एका तलावाजवळ काही दिवसांपूर्वी 47 मोरांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, पक्ष्यांना शेतातील धान्य खाल्याने त्यांना विषबाधा झाल्याची शक्यता वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. तसेच पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले आहे की, शिकारी आणि शेतकर्‍यांकडून या पक्ष्यांना वाढत्या धोक्यांबद्दल त्यांना चिंता वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *