महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २४ जानेवारी – मराठवाड्यातील परभणीमध्ये आज पेट्रोलचे दर 94.63 रुपये तर पॉवर पेट्रोल 98 रुपयांपर्यंत वधारले. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 92.20 रुपये तर डिझेल 81.41 रुपयांपर्यंत कडाडले आहेत. हेच दर पुढील काही दिवसांत शंभर रुपयांपर्यंत जाणार असल्याच्या भीतीने ग्राहकांच्या पोटात गोळा आला आहे. तज्ज्ञांच्या मते केंद्र सरकार आणि राज्य सरकारने इंधनावर भरमसाट कर आकारल्याने इंधन महागले आहे. आंतरराष्ट्रीय तेल उत्पादक संघटना ‘ओपेक’ने इंधन उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्याने पेट्रोल-डिझेल महागले असल्याचे आणखी एक कारण तज्ज्ञ सांगत आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव तुलनेने कमी आहेत. पण केंद्र व राज्य सरकारने भरमसाट कर लावल्याने इंधनाचे दर दररोज वाढत आहेत. साधारणतः 1 रुपया दरवाढ झाली तर त्यामागे 3 ते 4 रुपयांनी प्रतिलिटर इंधन महागते, असे विश्लेषण तज्ज्ञांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या किमतीत बदल झाला की, ऑईल कंपन्या दररोज इंधनाचे दर बदलतात. हा बदल केंद्र सरकारने ऑईल कंपन्यांवरील नियंत्रण काढल्यामुळे झाला आहे. कोव्हिड काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या होत्या. पण भारतात या काळातही इंधन दरात काही प्रमाणात चढउतार होत होता.
पेट्रोल, डिझेलमध्ये किंचित वाढ होत असली तरी पेट्रोल प्रतिलिटर आता 93 वर गेले आहे. तर डिझेलही प्रति लिटर 82 रुपये झाले आहे. कारण काही पैशांच्या वाढीमागे भरमसाट कर आकारणी होत असल्याने दररोज रुपयांमध्ये दरवाढ होत असते.
सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने भारतातील इंधनाच्या दरात वाढ होत चालली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून इंधन दरात वाढ होत असून पेट्रोलचे दर शंभरी गाठणार,
दरवाढीची कारणे
लॉकडाऊनमुळे पाश्चात्त्य देशात इंधनाची मागणी घटली, त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधन उत्पादक कंपन्यांच्या ओपेक या संघटनेचा उत्पादन कमी करण्याचा निर्णय आपसूकच प्रतिलिटर इंधनावर केंद्र सरकारचा अबकारी कर, व्हॅट आणि राज्य सरकारचा सेस यात होणारी वाढ ,लस आल्याने इंधनाची मागणी आणखी वाढणार, सरकारला आपले उत्पन्न कमी करावयाचे नसल्याने हे कर कमी होण्याची शक्यता कमी