. “जर चीन आक्रमक होऊ शकतो तर आपणही होऊ शकतो. आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत’ ; हवाई दल प्रमुखांनी ठणकावलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २४ जानेवारी – चीन सीमेवर असलेल्या प्रचंड तणावाच्या परिस्थितीत हवाई दल प्रमुख ( iaf chief ) आरकेएस भदौरिया ( rks bhadauria ) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी चीनला इशारा दिला आहे. चीन एलएलसीवर आक्रमक झाला तर त्याला सणसणीत उत्तर दिले जाईल. बीजिंगने आक्रमक धोरण अवलंबल्यास आपणही आक्रमक होऊ शकतो, असं हवाई दल प्रमुखांनी शनिवारी सांगितलं.

जोधपूरमध्ये भारतीय हवाई दल आणि फ्रान्सच्या हवाई दलाचा संयुक्त सराव ‘डेझर्ट नाइट -21’ वर पत्रकार परिषदेदरम्यान हवाई दल प्रमुखांनी माहिती दिली. “जर चीन आक्रमक होऊ शकतो तर आपणही होऊ शकतो. आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत’, असं हवाई दल प्रमुख म्हणाले.

पूर्वेकडील सीमेवरही असाच सराव केला जातोय का? असा प्रश्न हवाई दल प्रमुखांना करण्यात आला. आम्ही कोणत्याही देशाविरूद्ध सराव करत नाहीए. आपल्या क्षमता विकसित करण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी हे केले जात आहे. ५ व्या पिढीच्या लढाऊ विमानांमध्ये सर्व नवीन तंत्रज्ञान आणि सेन्सर बसवण्याची आमची तयारी आहे, असं त्यांनी सांगितलं.

भारतीय हवाई दलात फ्रान्सने बनवलेल्या ८ राफेल विमानांचा आतापर्यंत समावेश करण्यात आला आहे. फ्रान्सकडून घेण्यात येणाऱ्या ३६ राफेल विमानांपैकी हे ८ विमानं आहेत. राफेल विमानांसाठी भारताने फ्रान्ससोबत करार केला. ८ राफेल विमानं आली आहेत. आता आणखी तीन राफेल विमानं या महिन्याच्या अखेरीस भारतात दाखल होतील, अशी माहिती हवाई दल प्रमुखांनी दिली.

पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व ३६ राफेल विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश केला जाईल. ११४ मल्टीरोल लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी राफेल देखील एक महत्त्वाचा उमेदवार आहे. भारतीय वायुसेनेने डीआरडीओशी ५ व्या पिढीच्या लढाऊ विमानांच्या उत्पादनाचा कार्यक्रम सुरू केला आहे, असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *