फेसबुकचा वापर करणाऱ्या नागरिकांनी सावधान ; फेसबुकबद्दलची आणखी एक धक्कादायक माहिती समोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. २७ । नवीदिल्ली । फेसबुकचा (facebook) वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, या समाज माध्यमांच्या (social media) अतिवापरासोबतच नागरिकांचे खासगी आयुष्यही तितकंच कमी होत असल्याचं चित्र आहे. फेसबुक आणि डेटा लीक ( facebook data leak) प्रकरण तसं जुनंच आहे. आता अशीच फेसबुकबद्दलची आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. फेसबुक आपल्या 50 कोटी वापरकर्त्यांचा फोन नंबर टेलीग्रामवर बॉटच्या माध्यमातून विकत आहे.

सुरक्षा संशोधकांच्या म्हणण्यानुसार, टेलीग्राम (telegram) बॉटकडे जवळपास 500 Million म्हणजे 50 कोटी वापरकर्त्यांचे नंबर आहेत. आज तकने यासंदर्भात बातमी दिली आहे. 2019 मध्ये फेसबुकमधील काही त्रुटींमुळे लीक झालेल्या माहितीचाच हा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे.

टेलीग्रामवर बॉट बनवणाऱ्या सुरक्षा संशोधकांच्या मते, 2020 च्या सुरुवातीलाच फेसबुकच्या या त्रुटीबद्दलची माहिती समोर आली होती. त्यामुळे, लोकांनी फेसबुकवर लिंक केलेले फोन नंबर टेलीग्राम बॉटच्या माध्यमातून अत्यंत कमी किमतीत विकले जात होते.

‘मदरबोर्ड’ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, फेसबुक डाटा ब्रीच (Facebook data breach) मधून फोन नंबर लिक झालेल्या नागरिकांचा नंबर टेलीग्रामचा बॉट फेसबुकवरील वापरकर्त्यांच्या आयडीवरुन सर्च करताच उपलब्ध करुन देत आहे. सुरक्षा संशोधकांच्या मते, हा संपूर्ण डाटा सायबर क्राइम कम्युनिटीजला विकला जात आहे. त्यामुळे, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. तसंच फ्रॉड कामांसाठी सायबर गुन्हेगार याचा वापरही करु शकतात. त्यामुळे, फेसबुकचा वापर करणाऱ्या नागरिकांनी अशा घटनांपासून आपला बचाव करणं अधिक गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *