सर्वसामान्यांना दिलासा फेब्रुवारीपासून बिनधास्त प्रवास करा ; केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. २८ । नवीदिल्ली । केंद्रीय गृहमंत्रालयानं (MHA) कोरोनासंबंधित नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार राज्यांअंतर्गत आणि आंतरराज्यीय प्रवासाला बंदी नाही. व्यक्तींनाही प्रवास करता येईल. शिवाय सामानाचीही वाहतूक करता येईल. सीमा पार करून शेजारील देशांमध्येही प्रवास करण्याची मुभा आहे. त्यासाठी कोणत्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. देशात गेल्या चार महिन्यांत कोरोनाची (coronavirus) नवीन प्रकरणं कमी झाली आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचं चित्र आहे. ही परिस्थिती पाहता केंद्रीय गृहमंत्रालयानं (Ministry of Home Affairs) कोरोनासंबंधित नवीन मार्गदर्शक सूचना जारी (corona news guidelines) केल्या आहेत. ज्यामध्ये नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

असं असलं तरी आंतरराष्ट्रीय विमान सेवेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. नागरी उड्डाण मंत्रालय (Ministry of Civil Aviation) आणि केंद्रीय गृहमंत्रालय परिस्थिती पाहून आंतराराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा सुरू करायची ही नाही याबाबत निर्णय घेईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
तरीदेखील आवश्यक ती काळजी घेण्याची आणि नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचंही केंद्रानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोनसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक कार्यक्रमांना हॉलमध्ये 50 टक्के लोकांसह आणि खुल्या भागात 200 व्यक्तींची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे. पण याबाबत निर्णय घेण्याचा अधिकारही राज्यांना सोपवण्यात आला आहे.तसंच 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले, आजारी, प्रेग्नंट महिला आणि दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणिआरोग्य सेतू अॅपचाही वापर करावा असा सल्लाही केंद्रीय गृहमंत्रालयानं दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *