Apple iPhone 12 सीरीजचं उत्पादन भारतातच करणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. २८ । नवीदिल्ली । अमेरिकेची (America) तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी Apple आता चीनला (China) मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, Apple कंपनी आता आयफोन, आयपॅड, मॅक आणि इतर वस्तूंच चीनमधील उत्पादन केंद्र इतरत्र हालवणार आहे. Apple कंपनी आता लवकरच आपल्या पहिल्या 5G स्मार्टफोन आणि आयफोन 12 (iPhone 12) सीरीजच्या उत्पादनाला भारतात सुरू करणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, Apple कंपनीच्या आयपॅडचं उत्पादन व्हिएतनाममध्ये होणार आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत हे उत्पादन सुरू होणार आहे. Apple कंपनी पहिल्यांदाच चीनबाहेर एवढ्या मोठ्या संख्येनं उत्पादन तयार करणार आहे.Apple कंपनी भारतातही आयफोनचं उत्पादन वाढवण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयफोन12 च्या सीरीजचं उत्पादन याच तिमाहीत सुरू केलं जाणार आहे. अॅपल कंपनीचे फोन तयार करण्याचं सर्वात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं उत्पादन केंद्र भारत आहे.

आग्नेय आशियामध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी Apple कंपनी बर्‍याच भागात आपली उत्पादन केंद्रे निर्माण करण्याच्या विचारात आहे. Apple कंपनीचे स्मार्ट स्पीकर्स, इयरफोन आणि संगणक या वस्तूंच उत्पादन वाढवण्यावरही कंपनी भर देत आहे. Apple कंपनीच्या उत्पादन केंद्रात फेरबदल करणं हा कंपनीच्या रणनीतीचा हा एक भाग आहे. 2021 मध्ये या क्षेत्रात तेजी येईल, हे यामागचं गणित आहे. मात्र दुसरीकडे बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे अमेरिका आणि चीनमधील संबंध सुधारू शकतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *