महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२०। पुणे । सखी राज्ञी जयती आयोजित शिवजयंती साजरी केली. सदर कार्यक्रम सोरखाडे कुटी येथे पार पडला. सोरखाडे कुटुंब गेली ३५ वर्षे सखी राज्ञी जयती मंचाद्वारे शिवजयंती साजरा करत आहे. दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण कार्यक्रम करण्याकडे यांचा कल असतो. गतवर्षी कागदी लगद्यापासून बनवलेल्या किल्ल्यांचे प्रदर्शन तर ह्या वर्षी कोरोनाचे संकट लक्षात घेता ऑनलाईन पुस्तक वाचन कार्यक्रम आयोजित करत वैचारिक शिवजयंती साजरी केली. कार्यक्रमात शिवप्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन कोव्हिड योद्धे डॉ. वैशाली बांगर शबाना शेख, मनिषा मेटे, अनुपमा लोंढे व आशा जाधव यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाची लिंक :
Youtube Channel Link : https://youtu.be/VTrMh6UkTpg
कार्यक्रमास पोलीस अंमलदार श्री. संतोष फावडे, श्री. विठ्ठल मदने, श्री. अमोल माने व ए पी आय नीता उबाळे यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वकील वंदना सोरखाडे यांनी केले. व्यास क्रिएशनचे शूर आम्ही सरदार या पुस्तकातील काही भागाचे वाचन केले गेले. पुस्तक वाचनात ऍड. ज्योती सोरखाडे, ऍड. वंदना सोरखाडे, सोनाली तेंडुलकर, उमा भालेराव, ऍड. शशांका यादव, ऍड. दिपाली राऊत, मनाली कोंडे, दिपाली अय्यचित, नेहा थोरात, ओंकार बागले, स्वप्नील केंजळे, राज बोरुटे, माही तेंडुलकर, जान्हवी सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला. सदर वाचनाच्या रेकॉर्डिंग, एडिटिंगची धुरा एस. के. स्टुडिओ चे श्री. सचिन खाडे यांनी सांभाळली. वकिल ज्योती सोरखाडे लिखित “छत्रपती शिवाजी महाराजांचे तरुण पिढीला आलेले पत्र” यांचे वाचन करण्यात आले.अशी माहिती सखी राज्ञी जयतीच्या अध्यक्षा ज्योती सोरखाडे यांनी दिली.