महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. २० – देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओला भारती एअरटेलने सलग पाचव्या महिन्यात झटका दिलाय. डिसेंबर 2020 मध्ये सलग पाचव्या महिन्यात एअरटेलने जिओपेक्षा जास्त नवीन युजर आपल्या नेटवर्कशी जोडले आहेत.भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये एअरटेलच्या नेटवर्कवर 40 लाखांपेक्षा जास्त नवीन वायरलेस सब्सक्राइबर आले. तर, जिओचं नेटवर्क घेणाऱ्यांची संख्या केवळ 4.7 लाख होती.
दुसरीकडे, व्होडाफोन आयडियालाही (Vi) चांगलाच फटका बसलाय. डिसेंबर 2020 मध्ये व्होडाफोन-आयडियाच्या जवळपास 57 लाख युजर्सनी सेवा सोडल्याचं समोर आलंय. व्होडाफोन-आयडियाची सेवा सोडणारे युजर्स एअरटेलच्या नेटवर्ककडे वळत असल्याची शक्यता आहे.
एकूण ग्राहकसंख्या :ट्रायच्या मोबाइल युजर डेटावरुन, डिसेंबरमध्ये एअरटेलचे ग्राहक वाढून 33.87 कोटी झालेत. तर, जिओची ग्राहकसंख्या वाढून 40.87 कोटी झाली आहे. पण तोट्यात असलेल्या व्होडाफोन आयडियाची ग्राहक संख्या घटून 28.42 कोटी झाली आहे.