Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
फेब्रुवारीत दिसून येणारे एक दृश्य कुठल्याही कल्पनेपेक्षा कमी नाही - Maharashtra 24

फेब्रुवारीत दिसून येणारे एक दृश्य कुठल्याही कल्पनेपेक्षा कमी नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२२।  अमेरिकेच्या एका राष्ट्रीय उद्यानात दरवर्षी फेब्रुवारीत दिसून येणारे एक दृश्य कुठल्याही कल्पनेपेक्षा कमी नाही. जगभरातून हजारो लोक काही क्षणांसाठी येथे ‘आगीचा झरा’ पाहण्यासाठी येतात. कॅलिफोर्नियात सुमारे 1500 फूट उंच टेकडीवरून वाहणारा हॉर्सटेल फॉल्स एखाद्या ज्वालामुखीतून वाहणाऱया लाव्हारसासमान भासतो. हा केवळ नजरेतील आभास असून तेथे आगीसारखे काहीच नाही. योसमाइट नॅशनल पार्कमध्ये याचे एक दृश्य पाहण्यासाठी फेब्रुवारीत 10 दिवस लोक येत असतात. काही क्षणांना डोळय़ात कैद करण्याचा हा अनुभव निसर्ग छायाचित्रकार कधीच विसरू शकत नाहीत.

हॉर्सटेल फॉल्स हा पाण्याचाच झरा आहे. केवळ प्रकाशाचा हा खेळ छायाचित्रकारांसाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. सुमारे चार वर्षांनी झरा वाहत्या लाव्हासारखा दिसण्याची स्थिती निर्माण होत असल्याचे स्थानिक छायाचित्रकार सांगतात. सूर्य या झऱयाच्या बरोबर समोर अस्ताला जातो, जेव्हा एका विशिष्ट कोनात घडते, तेव्हा झरा नारिंगी-लाल रंगात दिसू लागतो. हे दृश्य पाहण्यासाठी लोकांना काही अंतरावर एका विशिष्ट ठिकाणी उभे राहण्यास सांगितले जाते. येथून लाव्हाचे रुप धारण करणाऱया झऱयाचे शानदार छायाचित्र प्राप्त होते.

हे दृश्य आम्ही पाहतो आणि पहातच राहतो असे लोकांचे म्हणणे आहे. फेब्रुवारीतील काही विशेष दिवसानंतर हे दृश्य गायब होते. हे दृश्य पाहण्यासाठी फेब्रुवारीच्या अखेरीस बर्फ असायला हवा आणि दिवसाकाठचे तापमान बर्फ वितळविणारे आणि सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचविणारी असावीत. सद्यकाणत संध्याकाळी सुमारे 10 मिनिटांसाठी हा झरा लाव्हाचे रुप धारण करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *