भारतात अधिकृतरित्या लाँच TATA ची ‘लाडकी’ Safari ; 15 लाखांपेक्षाही कमी किंमत

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२२। पुणे । टाटा मोटर्सची नवीन टाटा सफारी दीर्घ काळाच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज भारतात अधिकृतरित्या लाँच करण्यात आली आहे. टाटाची ही आयकॉनिक एसयूव्ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. नव्या सफारीच्या किंमतीचाही आता कंपनीने खुलासा केला आहे.XE, XM, XT, XT+, XZ आणि XZ+ अशा सहा व्हेरिअंट्समध्ये टाटा मोटर्सने आपली नवीन सफारी आणली आहे. यासोबतच कंपनीने ही एसयूव्ही 6-सीटर आणि 7-सीटर अशा दोन्ही मॉडेलमध्येही लाँच केली आहे. यात 7-सीटर मॉडेलमधील सफारी सर्व व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे, पण केवळ XZ+ या व्हेरिअंटमध्येच 6-सीटर मॉडेल उपलब्ध असेल. डायटोना ग्रे, रॉयल ब्लू आणि ऑर्कस व्हाइट अशा तीन रंगांच्या पर्यायात 2021 Tata Safari लाँच करण्यात आली आहे.

18-इंचाचे अ‍ॅलॉय व्हील्स नवीन सफारीमध्ये आहेत, त्याचबरोबर Tata Harrier च्या तुलनेत नवीन सफारी 63 मिलीमीटर लांब आणि जवळपास 80 मिलीमीटर उंच आहे. शिवाय नवीन सफारीचं फ्रंट लूक री-डिझाइन करण्यात आले असून यात क्रोम एलिमेंट्सही दिले आहेत. सफारीच्या मागील बाजूलाही नवीन एलईडी टेललॅम्पसोबत री-डिझाइन लूक बघायला मिळेल.प्रजासत्ताक दिनी नवीन सफारीवरुन टाटा मोटर्सने पडदा हटवला होता. त्यानंतर देशातील कोणत्याही टाटा मोटर्सच्या अधिकृत डिलरशीपमध्ये या एसयूव्हीसाठी 4 फेब्रुवारीपासून 30 हजार रुपयांमध्ये बूकिंगला सुरूवात झाली. पण, या गाडीच्या किंमतीबाबत अद्याप कंपनीने घोषणा केली नव्हती. पण कंपनीने आज किंमत जाहीर केली आहे.

टाटाची ही सफारी आयकॉनिक एसयूव्ही आहे. या एसयुव्हीचा नवीन अवतार अधिक दमदार असून या एसयूव्हीला नवीन सफारीची रचना, कार्यक्षमता, मल्टी टास्किंग, सेवा आणि दीर्घकाळ टिकणारी डेव्हलपमेंट क्वालिटी ही वैशिष्ट्ये पूर्वीपेक्षा अधिक दमदार बनवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *