महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२५। मुंबई । मुंबईत कोरोनाने पुन्हा आपले डोके वर काढले असतानाही मोकाट फिरणार्या मुंबईकरांना आवर घालण्यासाठी मुंबई महापालिकेने मिनी लॉकडाऊनची तयारी सुरू केली आहे. मुंबईकरांवर पुन्हा काही निर्बंध लादण्यात येणार असून रस्त्यावर कामाशिवाय फिरणार्यांवर कारवाई होणार आहे. मोटरसायकल, चारचाकी वाहनचालकांचीही चौकशी होणार आहे. गर्दी कमी करण्यासाठी काही नियम तयार करण्यात येत असून या सर्व नियमांची अंमलबजावणी येत्या दोन-तीन दिवसात सुरू होणार असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. याची अंमलबजावणी जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात येणार असल्याचेही समजते.
असे असतील निर्बंध
सम-विषम संख्येनुसार दुकाने सुरू ठेवण्यात येणार
दुकानात गर्दी दिसल्यास दुकानदारावर होणार कारवाई
हॉटेलांत क्षमतेच्या 50 % ग्राहकांना प्रवेश देण्याची मुभा
हॉटेल, बारच्या वेळा रात्री अकरा वाजेपर्यंतच
दुकानदारांना सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यात मुभा
खाद्यपदार्थ पार्सलवर भर देण्याच्या हॉटेल चालकांना सूचना
मोठ्या भाजी मार्केट व मासळी बाजारात भाजी व मासळी विक्रेते बसण्याच्या जागेमध्ये नियोजन. दोन विक्रेत्यांना शेजारी-शेजारी बसण्यावर बंदी
मास्क नसलेल्या नागरिकाला वस्तू देण्यास दुकानदाराला बंदी
विनाकामाचे फिरणार्यावर होऊ शकते कारवाई
मुंबईतील सर्व उद्याने व मैदाने पुन्हा बंद करणार
बेस्ट बसमध्ये 50 टक्के प्रवासी
शेअर टॅक्सी व ऑटो रिक्षाला बंदी
टॅक्सीमध्ये दोन प्रवासी तर रिक्षामध्ये एक प्रवासी
खासगी वाहनांत फक्त चौघांना प्रवास