खासदार उदयनराजेंनी घेतली राज ठाकरे यांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २७ – मुंबई – भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. याच अनुषंगाने त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे.राज ठाकरे आणि उदयनराजे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षणासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.यापूर्वी उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील चर्चा केली होती. आता त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत.

मराठा आरक्षणावरून काही महिन्यांपासून राज्यातील वातावरण तापत आहे. आरक्षण प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका केली जात असतानाच सरकारने आता वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत.मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबी यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. या संभाव्य बैठकीबाबत अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या रविवारी या नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करून कोर्टात भूमिका मांडण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *