महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – पुणे – देशभरात 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात होणार आहे. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. सरकारी रुग्णालयांसोबत आता खासगी रुग्णालयातही कोरोनाची लस देण्यात येणार असून एका डोससाठी 250 रुपये मोजावे लागू शकतात असे समजते. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला टप्पा देशभरात सुरू असून, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगारांसह कोरोना फ्रंटलाईन वर्क्सना पैकी 77% लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आता नागरिकांसाठी लसीकरण खुले केले आहे. देशभरातील 10 हजार सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांवर ही लस मोफत दिली जाईल. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्यांना लस मिळेल.
Private hospitals functioning as COVID-19 Vaccination Centres may recover a charge subject to a ceiling of Rs 250 per person per dose: Government of India
— ANI (@ANI) February 27, 2021
20 हजार खासगी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांवरही लस उपलब्ध असणार आहे. खासगी केंद्रांवर लस घेताना पैसे मोजावे लागतील. हा बुस्टर डोस आहे. त्यामुळे दोन डोससाठी किती पैसे लागणार याचा निर्णय तीन ते चार दिवसांत आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात येईल, असे काही दिवसांपूर्वी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले होते.