महागाईचा भडका, LPG सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ – मुंबई – LPG Cylinder Price Today : 1 मार्चला मोठा झटका बसला आहे. देशांतर्गत एलपीजी किंमत (LPG Cylinder Price) प्रति सिलिंडर 25 रुपयांनी वाढली आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तीन वेळा वाढ झाली होती. केवळ फेब्रुवारीमध्ये सिलिंडर 100 रुपयांनी महाग झाले होते. आज ही वाढ फक्त 26 दिवसांत एलपीजी 125 रुपयांनी महागला आहे.

25 रुपयांनी एलपीजी सिलिंडर महाग
दर महिन्याच्या सुरूवातीला एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतला जातो आणि नंतर 15 व्या दिवशी. त्यानंतर किंमती निश्चित केल्या जातात. आयओसीने (IOC) फेब्रुवारी महिन्यात 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तीन वेळा वाढ केली. प्रथम 4 फेब्रुवारीला, दुसऱ्यांदा 14 फेब्रुवारीला आणि तिसऱ्यांदा 25 फेब्रुवारीला किंमत 25 रुपयांनी वाढविण्यात आली. आज मार्चच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडर 25 रुपयांनी महाग झाला आहे.

LPG सिलिंडरची नवी किंमत
दिल्लीत अनुदानित एलपीजी सिलिंडर आता 25 रुपयांनी महाग झाला असून तो 819 रुपयांना मिळणार आहे. पूर्वी ते 794 रुपये होता. त्याचप्रमाणे मुंबईतही एलपीजी सिलिंडरसाठी 819 रुपये द्यावे लागतील. एलपीजी सिलिंडरसाठी कोलकाताला जास्तीत जास्त 845.50 रुपये द्यावे लागतील, चेन्नईमध्ये ग्राहकांना एलपीजी सिलिंडरसाठी 835 रुपये द्यावे लागतील.

1 फेब्रुवारीला किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नव्हती, परंतु 4 फेब्रुवारीला त्याचे दर पुन्हा 719 रुपये करण्यात आले. म्हणजेच 25 रुपयांची वाढ झाली. आणि पुन्हा एकदा, दहा दिवसातच एलपीजीच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली. यानंतर 25 फेब्रुवारी रोजी त्याची किंमत पुन्हा 769 रुपयांवरून 794 रुपयांवर गेली.

अशी करा चेक एलपीजी किंमत
एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनी आयओसीच्या संकेतस्थळावर जावे लागेल. येथे कंपनी दरमहा नवीन दर जारी करते. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx आपण या संकेतस्थळावर आपल्या शहर गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *