सोने चांदी दरातील चढ उतार ;, तज्ज्ञांच्या मते कधी करावी खरेदी ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ – मुंबई – Gold, Silver Rate Update : गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून आले. परंतु शुक्रवारी सोने-चांदीचे दर मोठ्या घसरणीसह बंद झाले. आज, MCX वर सोने बाजार एप्रिल वायदा 300 रुपयांनी वाढून सोने प्रति तोळा 46000 रुपये झाले. चांदीच्या दरातही 800 रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली.

MCX Gold: MCX वरील सोने एप्रिल बाजार आज प्रति दहा ग्रॅम 300 रुपयांनी वाढत उघडला. सध्या सोने दर प्रति तोळा 46040 रुपयांवर आहे. शुक्रवारी सोने दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, सराफा बाजार बंद होण्याच्या आधी काही तास सोने दरात घसरण पाहायला मिळाली. सोने बाजार 46,000 रुपयांच्या खाली बंद होऊन प्रति 10 ग्रॅम 45736 रुपयांवर बंद झाला.

सोने आणि चांदी बद्दल तज्ज्ञांचे मत
ट्रेडबल्स सिक्युरिटीज (Tradebulls Securities) करन्सी अँड कमोडिटी ज्येष्ठ संशोधन विश्लेषक भाविक पटेल सांगतात की, अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 1.9 ट्रिलियन डॉलर्सचे पॅकेजला मंजुरी दिली आहे. अमेरिकन बॉन्ड यील्डही आता स्थिर आहे. सोन्याच्या किंमतींनी या सकारात्मक भावनेतून रिकव्हरी दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात, मजबूत डॉलर आणि वाढत्या रोखे उत्पन्नामुळे सोन्याने 8 महिन्यांच्या नीचांकाला स्पर्श केला. सोने खरेदीबाबत सांगायचे झाले तर सोने दरात घसरण झाली की सोने खरेदी करणे योग्य आहे. कारण सोने आता अधिक मजबूत स्थितीत दिसून येत आहे. सोने 45800 दरात खरेदी करु शकता. 4,6500 रुपयांचे लक्ष्य ठेवा आणि 45500 च्या स्टॉपलॉसवर थांबा आणि खात्री करुन घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *