छावा स्वराज्य सेनेसे संस्थापक अध्यक्ष, राम घायतिडक यांचा डीवाय पाटील महाविद्यालय प्रशासनास इशारा
येत्या सात दिवसात निर्णय न घेतल्यास प्रशासनाला धारेवर धरणार
लाईव्ह महाराष्ट्र 24 । पुणे । विशेष प्रतिनीधी ।
पिंपरी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून फी वसुलीसाठी जो तगादा लावला आहे. त्या विरोधात छावा स्वराज्य सेना कमालीची आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या आठवडाभरापासून डी. वाय. पाटील प्रशासनाशी सातत्याने छावा स्वराज्य सेनेचे पदाधिकारी संपर्क साधत आहेत. अखेर सोमवारी त्यांनी औपचारिकता म्हणून निवेदन दिले. मात्र डी. वाय. पाटील प्रशासनाने केवळ आश्वासनांची खैरात केली आहे. परिणामी छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक पाटील हे कमालीचे आक्रमक झाले असून, येत्या आठवडाभरात डी. वाय. पाटील महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा कठोर इशारा घायतिडक पाटील यांनी दिला आहे.
कोरोना महामारीत पालक वर्ग अनेक समस्यांनी ग्रासला आहे. त्यातच विद्यार्थ्यांची फि भरायची असल्यामुळे अजून आर्थिक समस्यांमुळे पालकवर्ग पिचला आहे. ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’ अशी अवस्था सध्या अनेकांची झालेली आहे.
पुणे विद्यापीठ प्रशासनानेही यांची गांभिर्याने दखल घ्यावी, अन्यथा विद्यापीठ प्रांगणातही अशाच प्रकारे आंदोलन छेडून विद्यापीठ प्रशासनाचेही लक्ष विद्यार्थी, पालकांच्या समस्यांकडे वेधणार आहोत. एवढेच काय तर छावा स्वराज्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही निवेदन दिले आले आहे. मात्र त्यांच्याकडूनही कोणताच प्रतिसाद अद्याप मिळाला नाही. ही महाराष्ट्राची शोकांतीका आहे. सध्या शालेय शिक्षण विभागाकडे कोणत्याही प्रकारचे काम नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गैरसोयींकडे तरी किमान शासनाने लक्ष वेधावे, अशी पालकवर्गाची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र शासनानेही अशा खासगी शिक्षण संस्थांवर अंकुश ठेऊन त्यांना विद्यार्थ्यांच्या हितासाठी फि सवलतीसाठी त्वरित अद्यादेश पारीत करून त्याच्या अंमलबजावणीचे आदेश महाराष्ट्रभरातील शिक्षण संस्थांना देण्यात यावेत, असे मत घायतिडक पाटील यांनी महाराष्ट्र 24 शी बोलताना व्यक्त केले.