फेब्रुवारीत 23% कार विक्री वाढली ; पेट्रोल-डिझेल, वाढत्या किमतीचा परिणाम नाही;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २ – मुंबई – देशाच्या वाहन उद्योगावर पेट्रोल-डिझेलच्या किमती विक्रमी उंचीवर पोहोचणे आणि वाहनांच्या किमती वाढण्याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. गेल्या फेब्रुवारीत कार आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत सलग सातव्या महिन्यात वाढ पाहायला मिळाली. वाहन उद्योगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीत सुमारे ३.०८ लाख कार आणि एसयूव्ही कारखान्यांतून निघून शोरूम्समध्ये पोहोचल्या आहेत. वार्षिक आधारावर या प्रकरणात २३ टक्के वाढ नोंदली आहे. प्रवासी वाहनांची विक्री वाढल्याच्या प्रकरणात टाटा मोटर्स सर्वात पुढे राहिली. फेब्रुवारीत या कंपनीने २७,२२५ प्रवासी वाहनांची विक्री केली. हा आकडा गेल्या फेब्रुवारीत झालेल्या विक्रीच्या तुलनेत ११९ टक्के जास्त आहे. हा गेल्या नऊ वर्षांत कोणत्याही महिन्यात झालेल्या कंपनीची जास्तीत जास्त विक्री आहे.

यादरम्यान १४४,७०० प्रवासी वाहने विकून मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेची लीडर ठरली. मात्र, या प्रकरणात हिची वृद्धी केवळ ८ टक्के नोंदली आहे. मात्र, जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत मारुती सुझुकीचा बाजार हिस्सेदारी १.१६ टक्के वाढून ४६.९ टक्के झाली. मात्र, फेब्रुवारी २०२० च्या तुलनेत हा कमी आहे. कंपनीची बाजार हिस्सेदारी ५३.३% होती. ह्युंदाई मोटरची विक्री यापेक्षा खूप जास्त २९ टक्के वाढून ५१,६०० वाहने राहिली. फेब्रुवारीत टोयोटाची विक्रीही ३६ टक्के वाढीसह १४,०६९ वाहनांपर्यंत पोहोचली.

पुढील महिन्यात आणखी चांगल्या विक्रीची अपेक्षा
पुढील महिना आणखी चांगली विक्री होण्याच्या आशेत विक्री वाढली आहे. लोक वैयक्तिक सुरक्षेसह प्रवासी वाहनाकडे लक्ष देत आहेत. पुरवठा साखळी आधीपेक्षा चांगली आहे, मात्र यामध्ये पूर्णपणे सुधारणा होऊ शकली नाही. पुरवठा साखळी आणखी चांगली राहिल्यास विक्रीचे आकडे आणखी जास्त होऊ शकत होते. पुढील महिन्यात आणखी यात चांगल्या निकालाची अपेक्षा आहे. पुढील महिना आणि या तिमाहीत चांगल्या निकालाची आशा आहे. – विंकेश गुलाटी, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन(फाडा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *