उद्या जागतिक श्रवण दिन : सतत हेडफाेनचा वापर, येतोय बहिरेपणा; 6% लाेकांना त्रास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २ – संभाजीनगर – भारतात लाेकांमध्ये बहिरेपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढते ध्वनिप्रदूषण, ८० डेसिबलपेक्षा जास्त कर्णकर्कश आवाजामुळे श्रवणशक्तीचा ऱ्हास हाेताे. तसेच सतत हेडफोनवर मोठ्या आवाजात गाणी एेकल्यामुळेही हा त्रास हाेताे. सध्या देशभरातील सुमारे ६.३ टक्के लाेक या आजाराने त्रस्त आहेत.संभाजीनगरच्या कान-नाक-घसा डाॅक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सावजी यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ३ मार्च रोजी जागतिक श्रवण दिन आहे. ‘हिअरंग केअर फॉर ऑल’ ही या वर्षीची थीम आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी ही माहिती देण्यात आली.

ध्वनिप्रदूषण, हेडफोनचा अतिवापर, काही वेळा अपघात-आजार वा जन्मजात व्यंगामुळे बहिरेपणाचे रुग्ण वाढत आहेत. कानावर आवाजच पडत नसेल तर संवाद साधता येत नाही आणि त्या व्यक्तीचे आयुष्य कठीण बनते. मूकबधिर व्यक्तींचे आयुष्य तर अधिक कठीण असते. या पार्श्वभूमीवर संभाजीनगरतील ईएनटी डाॅक्टरांनी बहिरेपणा आणि त्यासंबंधित उपचार पद्धतीबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. डीजे बँड वाजवणाऱ्या लोकांना बहिरेपणाची समस्या लवकर जाणवते. कंपनीमध्ये मोठमोठ्याने होणाऱ्या आवाजाचा परिणामही कामगारांवर होत असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या वेळी संघटनेचे सचिव डॉ. रितेश भाग्यवंत, डॉ. संभाजी चिंतले, डॉ. अतुल पोरे, डॉ. सचिन नागरे, डॉ. जितेंद्र राठोड, डॉ. स्नेहा डोंगरदिवे, डाॅ. महेंद्र कटरेंची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *