Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
अमेरिकन डॉलरचे दर घसरताच सुवर्ण बाजारात उलटफेर; वधारतेय सोने-चांदी - Maharashtra 24

अमेरिकन डॉलरचे दर घसरताच सुवर्ण बाजारात उलटफेर; वधारतेय सोने-चांदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.४ मार्च – मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सुवर्ण बाजारात उलट चित्र दिसत असून, अमेरिकन डॉलरचे दर वाढल्याने सोने-चांदी स्वस्त होत आहे, तर डॉलर घसरल्यास सोने-चांदी दरात वाढ होत आहे. अशाच प्रकारे बुधवारीदेखील डॉलर घसरला असताना चांदीच्या भावात दोन हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ती पुन्हा ७० हजारांवर पोहोचली. तसेच सोन्याच्याही भावात ३०० रुपयांनी वाढ होऊन ते ४६ हजार ५०० रुपयांवर पोहोचले.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील डॉलरच्या दराचा होणारा परिणाम यावेळी सुवर्णबाजारावर उलट होताना दिसत आहे. एरवी डॉलरचे दर वधारल्यास सोने-चांदी महाग होते. मात्र गेल्या आठवड्यापासून यात उलटफेर होत आहे. सट्टाबाजारातील खेळीमुळे अस्थिरता निर्माण झाली असल्याचे दररोज चित्र आहे.
गेल्या आठवड्यात २२ फेब्रुवारी रोजी डॉलरचे दर कमी होऊन ७२.३९ रुपयांवर आले असताना त्या दिवशी चांदीत ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ७० हजार ५०० रुपयांवर पोहोचली होती, तर सोन्यात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ४७ हजार ५०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी डॉलर वधारून ७३.०५ रुपयांवर गेला असता चांदीत ५०० रुपयांची व सोन्यातही ५०० रुपयांनी घसरण झाली होती. २७ रोजी डॉलरमध्ये पुन्हा वाढ झाली त्यावेळी चांदीत एक हजार ५०० रुपयांनी, तर सोन्यात ५०० रुपयांनी घसरण झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *