ऑनलाइन गेमपासून सावध राहण्याचे महाराष्ट्र सायबर चे आवाहन

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.६ मार्च – पुणे – लॉकडाऊनच्या काळात विरंगुळा म्हणून ऑनलाइन गेम खेळण्याकडे कल वाढला. ऑनलाइन गेम हे ग्राफिकल, आकर्षक आणि चटक लावणारे आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगार आता ऑनलाइन गेमच्या नावाखाली मुलांचा वापर करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा गेमपासून सावध राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बाजारात येणाऱ्या अनेक गेमचा स्तर आवड आणि आकर्षित करणारा असतो. अशात एका ठरावीक लेवलनंतर याचे व्यसन जडताच, पुढील लेवलसाठी पैसे भरण्याच्या सूचना दिल्या जातात. यात नाममात्र शुल्क असते. याचाच फायदा घेत, जास्त लोकप्रिय असलेल्या गेमच्या सुरक्षेचे खंडन करून, त्याच्यासारखे हुबेहूब बनावट संकेतस्थळ तयार करतात. पुढे हॅकर तुमची गोपनीय माहिती चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतात.

सध्या ८ ते ९ वयोगटातील मुला-मुलींनाही पालकांच्या डेबिट, क्रेडिट कार्डचा पिन क्रमांक माहीत असतो. ते अनेकदा याचा वापरही करतात.
गेमची पुढील लेवल खेळण्यासाठी ही मुले त्यात गेम खरेदीसाठी कार्डची गोपनीय माहिती शेअर करतात. याच माहितीचा गैरवापर करीत तुमच्या खिशाला फटका बसू शकतो. त्यामुळे अशा गेमिंगपासून सावध राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.

#आपल्या मुलांना ऑनलाइन गेम खेळण्यासाठी मोबाइल, लॅपटॉप किंवा
कॉम्प्युटरसारखे कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस देण्यापूर्वी त्यात आपला बँक तपशील नाही ना? याची खात्री करून घ्या.
#आपला आर्थिक डेटा, बँक खाते तपशील, डेबिट-क्रेडिट कार्ड पिन क्रमांक मुलांपासून दूर ठेवा आणि त्यांना याची माहिती देऊ नका.
# आपल्या मुलांना बाहेर खेळायला पाठवा. आधी वास्तविक जगात नंतर ऑनलाइन गेमिंग जगात त्यांना जगायला शिकवा.

काय होते… : लहान मुळे गेम खेळत असताना त्याचे पुढे गेम स्तर बायपास करण्यासाठी गेम खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच वेळा हे हॅक केलेले गेम असतात. हॅकर्स मोबाइलमध्ये प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करतात. आपली सामाजिक क्रेंडेशियल्स आणि वैयक्तिक तपशील यांचीदेखील चोरी करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *