महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.६ मार्च – नागपूर – देशभरात कोरोना लसीकरणाचा (Coronavirus Vaccination Drive) दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यामध्ये 60 वर्षावरील सामान्य नागरिकांना आणि अन्य काही आजार असणाऱ्या 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस दिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह अनेक नेतेमंडळी, कलाकार आणि इतर क्षेत्रातील दिग्गजांनी देखील कोरोना लस टोचून घेतली आहे. दरम्यान आता कोरोना लस आता नाकावाटे देण्याच्या प्रयोग करण्यात येणार आहे. याबाबत देशभरात एकूण चार ठिकाणी चाचणी सुरू आहे. त्यापैकी नागपूर हे एक ठिकाण आहे
कोरोना लस नाकावाटे देण्यासंदर्भात चाचणी सुरू आहे. देशातील चार ठिकाणांपैकी एक असणाऱ्या नागपूरमध्ये देखील याबाबत चाचणी सुरू आहे. नागपूरच्या गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये याबाबत चाचणी सुरू आहे. नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीच्या चाचणीमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीचा वापर केला जाणार आहे. ही लस नाकावाटे थेट फुप्फुसात जाते. नाकावाटे लस दिल्याने थेट फुफूसात जाते असल्यामुळे अधिक चांगली रोगप्रतिकार निर्माण होते असा दावा केला जात आहे. दरम्यान नागपूरसह देशभरात हैदराबाद, भुवनेश्वर आणि पाटणा याठिकाणी सध्या याप्रकारची नाकावाटे लस देण्याची चाचणी सुरू आहे.