गॅस सिलेंडरच्या किंमती कमी कराव्यात; अन्यथा रस्त्यावर उतरणार ; महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.६ मार्च – पुणे – गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींनी घरेलु महिला कामगार हैराण, संघटनेचा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा घरेलु कामगार संघटनेने केला आहे. घरेलू कामगार महिलांना अनेक घरी जाउन धुणे/भांडी/स्वयपाक/ झाडू फरशी करुन मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात घर कस चालवाव हा विचार कायम त्यांच्या समोरअसतो, उतारत्या वयात काम करणाऱ्या महिला कमी घरात काम करत असल्यामुळे मिळनार पगार अत्तीशय कमी असतो, त्यात आजारपण असते त्यामुळे घर चालवन्यात मुळातच असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो.

गेल्या वर्षात लॉकडाऊनच्या काळातील त्रासदायक वाईट प्रसंगातून आत्ता कुठे सामान्य घरेलु कामगार सावरत आहेत, तोच गॅस दरवाढीमुळे महिन्याचा घरखर्च कसा करावा, त्यातच पेट्रोल /डिझेलच्या दरवाढी मुळे जिवनावाश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्या, पण या घरेलु महिला कामगारांना आहे त्या पगारात काम करावे लागते, पगार वाढत नाहीत,आणी सरकारच लक्ष देत नाही,कोणती शासकीय योजना नाही मग या सामान्य कामगार वर्गांने कसे जगावे याचा विचार सरकारने करावा.

किमान 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तरी या घरेलु महिला कामगारांना गॅस सिलेंडरची झालेली दरवाढ व जीवनावश्यक वस्तूंची झालेली दरवाढ कमी केल्याची भेट द्यावी.अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस शरद पंडीत यांनी केली आहे.

दोन वर्षापूर्वी गॅस सिलेंडर 400 रुपयाला मिळत होता तो आता 830 रुपयाला मिळतो आहे. गॅस सिलेंडरचे भाव त्वरित कमी करावेत या करीता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना संघटनेच्या वतीने 8 मार्च रोजी दरम्यान प्रत्यक्ष भेटूननिवेदन देण्यात येणार आहे. तसेच निवेदन दिल्यानंतर सुध्दा सिलेंडरचे भाव कमी झाले नाहीत तर केंद्र सरकारच्या दरवाढीचा जाहीर निषेध कण्यासाठी महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *