रेशनकार्डासंबधित अडचण असल्यास या क्रमांकावर करा तक्रार

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.६ मार्च – नवीदिल्ली – रेशन कार्ड (Ration Card) हा महत्त्वाचे सरकारी दस्तावेज आहे. याद्वारे नागरिकांना सार्वजनिक अन्नधान्य वितरण (Food Distribution) यंत्रणेअंतर्गत गहू, तांदूळ, तेल आदी जीवनावश्यक अन्नधान्य स्वस्त दरात पुरवलं जातं; मात्र अनेकदा रेशन दुकानदार ग्राहकांना वस्तू देण्यास टाळाटाळ करत असल्याचं दिसून येतं. अनेकदा हे धान्य ज्यादा दरानं अन्य दुकानदारांना विकलं जातं. सरकारकडं सातत्यानं याबाबत तक्रारी (Complaints) येत असल्यानं या यंत्रणेतील भ्रष्टाचार,गैरव्यवहार त्या दूर करण्यासाठी सरकारनं पावलं उचलली आहेत. यासाठी टोल फ्री क्रमांक जारी केले असून,यामुळं नागरिक आपल्या तक्रारी अगदी सहजपणे सरकारकडं करू शकतात.

एनएफएसएच्या(NFSA)वेबसाइटवर तक्रार करता येते : नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टलवर(NFSA)प्रत्येक राज्यासाठी(State)वेगवेगळे टोल फ्री क्रमांक(Toll Free Number)देण्यात आले आहेत. यावर किंवा एनएफएसएच्या वेबसाइटवरhttps://nfsa.gov.inतक्रार करता येईल. या वेबसाइटवर मेल किंवा फोन क्रमांकाच्या आधारे तक्रार नोंदवता येते. प्रत्येक राज्यात रेशन कार्ड बनविण्याची पध्दतही वेगळी आहे. गरीब नागरिकांना अनुदानित(Subsidy)किमतीत धान्य मिळावं,रेशन दुकान व्यवस्थेतील अनागोंदी दूर व्हावी यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. यासाठी हे टोल फ्री क्रमांक महत्त्वाचे ठरणार आहेत.

टोल फ्री क्रमांक : महाराष्ट्र- 1800-22-4950

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *