महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२० मार्च । मुंबई । कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. सप्टेंबरमध्ये जी रुग्णसंख्या होती तिच्या जवळपास किंवा पुढे आहोत. म्हणूनच जनतेने बंधने पाळणे गरजेचे आहे. नाही तर पुन्हा लॉकडाऊनचा पर्याय आहेच, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. जनतेच्या सहकार्याची अपेक्षा आहे. लोक आता मास्क वापरू लागले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. नंदुरबार जिह्यातील धडगाव येथे कोरोना लसीकरण आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले की, हा एक मार्ग आहेच. पण मला अजूनही लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. लसीकरण सुरू झाले आहे. जनतेने स्वतःहून लस घेण्यासाठी पुढे यावे. पुठेही लस कमी पडणार नाही याची शाश्वती पेंद्र सरकारने दिली आहेच. पाच-सात दिवस पुरेल इतका लसीचा साठा असल्याचेही ते म्हणाले.
विदेशी स्ट्रेन आपल्याकडे आला आहे, पण तो कंट्रोलमध्ये आहे. त्याचे आकडेही आले आहेत. या स्ट्रेनचा नवीन प्रकार आला आहे का याची खात्री नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यास आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनीही दुजोरा दिला.लॉकडाऊनचा पर्याय हा नक्कीच समोर दिसतो आहे. पण मला अजूनही लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे आणि जनता ते नक्की करेलच. बऱयाच ठिकाणी लोक आता मास्क घालायला लागले आहेत, नियम पाळायला लागले आहेत.